Raj Thackeray & Uddhav Thackeray: मोठी बातमी : उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या घरी, दोन विश्वासू शिलेदारही सोबतीला!

Continues below advertisement

Raj Thackeray & Uddhav Thackeray: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असलेले ठाकरे बंधूंनी बुधवारी कोणलाही पत्ता लागून न देता पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बुधवारी सकाळी अचानक राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत (Sanjay Raut) आणि अनिल परब हेदेखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. उद्धव ठाकरे हे अचानक राज ठाकरे यांच्या घरी गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या पाऊण तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठी या मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याचे द्योतक मानले जात आहे.

Sponsored Links by Taboola