Meeting
Asha Bhosle Health Update: बॉलिवूडच्या (Bollywood News) दिग्गज गायिका (Bollywood Singer) आशा भोसले (Asha Bhosle) यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीनं मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलंय. सुरुवातीला 92 वर्षांच्या हिंदी सिनेसृष्टीच्या (Hindi Film Industry) या वर्सटाईल गायिकेला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता त्यांच्या नातीनं पोस्ट करुन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं खरं कारण सांगितलं आहे. दरम्यान, सध्या आशा भोसले यांच्यावर 'आपत्कालीन वैद्यकीय विभागात' (Emergency Medical Unit) उपचार सुरू असून त्यांची नात जनाई भोसले (Zanai Bhosle) हिनं आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
'आपत्कालीन वैद्यकीय विभागात' (Emergency Medical Unit) उपचार सुरू असून त्यांची नात जनाई भोसले (Zanai Bhosle) हिनं आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
आशा भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 92 वर्षांच्या आशा भोसलेंच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत. आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर येताच, त्यांच्या प्रकृतीबाबत विविध तर्कवितर्क सुरू झालेत.
आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं स्पष्ट केलंय की, खूप अशक्तपणा आणि चेस्ट इन्फेक्शन (Chest Infection) झाल्यामुळे तिची आजी गायिका आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. तिनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "माझी आजी, आशा भोसले, यांना अशक्तपणा आणि चेस्ट इन्फेक्शन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आम्ही विनंती करतो की, तुम्ही आमच्या गोपनीयतेचा (Privacy) आदर करावा. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सर्व काही ठीक होईल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती देऊ..."









